राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
Elections in Maharashtra state in three phases
Elections in Maharashtra state in three phases

मुंबई : राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. १८ सप्टेंबर २०२२ रोजी ही निवडणूक होणार असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. थेट जनतेतून यंदा सरपंच निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला. (General Elections of 608 Gram Panchayats in Maharashtra announced)

Elections in Maharashtra state in three phases
चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

सुप्रीम कोर्टाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की, कमी पाऊस असलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा. कोर्टाच्या या आदेशानुसार, सध्या कमी पाऊस असलेल्या राज्यातील ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम असा असेल

१८ ऑगस्ट २०२२ - निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल

२४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ - नामनिर्देशपत्रे दाखल करता येतील

२७, २८, ३१ ऑगस्ट २०२२ - शासकीय सुट्ट्या असल्यानं अर्ज दाखल करता येणार नाहीत

२ सप्टेंबर २०२२ - अर्जांची छाननी होईल

६ सप्टेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) - अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

१८ सप्टेंबर २०२२ - मतदान होईल (स. ७.३० ते सायं. ५.३०)

१९ सप्टेंबर २०२२ - मतमोजणी होईल

कोणत्या जिल्ह्यात होणार निवडणुका -

नंदुरबार : शहादा- 74 व नंदुरबार- 75.

धुळे : शिरपूर - 33.

जळगाव : चोपडा- 11 व यावल- 02.

बुलढाणा : जळगाव (जामोद) - 01, संग्रामपूर - 01, नांदुरा - 01, चिखली- 03 व लोणार- 02.

अकोला : अकोट- 07 व बाळापूर- 01.

वाशीम : कारंजा- 04.

अमरावती : धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदुर रेल्वे- 01.

यवतमाळ : बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर - 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 08.

नांदेड : माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01.

हिंगोली : (औंढा नागनाथ)- 06.

परभणी: जिंतूर- 01 व पालम- 04.

नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17.

पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02.

अहमदनगर: अकोले- 45. लातूर: अहमदपूर- 01.

सातारा: वाई- 01 व सातारा- 08.

कोल्हापूर: कागल- 01.

एकूण: 608

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com