Government Scheme : गाई पाळा अन् मिळवा तब्बल 'इतके' अनुदान; सरकारने सुरू केली 'ही' योजना

गाई पाळण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने यंदा पुन्हा सुरू केली आहे.
Govardhan Govansh Seva Kendra Yojana
Govardhan Govansh Seva Kendra Yojanaesakal
Summary

गोशाळेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेत काही प्रमाणात बदलदेखील केले आहेत.

सातारा : गाई पाळण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने यंदा पुन्हा सुरू केली आहे. ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ (Govardhan Govansh Yojana) असे या योजनेला नाव दिले आहे.

याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला किमान १५ लाख, २० लाख आणि कमाल २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेद्वारे सरकारकडून ‘गाई पाळा, अनुदान मिळवा’, असा संदेश दिला आहे.

Govardhan Govansh Seva Kendra Yojana
Nana Patole : 'फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जे पाप घडलंय, त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील'

गेल्या काही वर्षांपासून ही योजना बंद होती. मात्र, गोशाळेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेत काही प्रमाणात बदलदेखील केले आहेत. त्यामध्ये अधिकृत नोंदणी असलेल्या आणि किमान तीन वर्षांचे ताळेबंद सादर करू शकणाऱ्या गोशाळांना गाईंच्या एकूण संख्येच्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे.

Govardhan Govansh Seva Kendra Yojana
Radhanagari : हसन मुश्रीफांचा 'दोस्त' कोणाला साथ देणार? साहेब की दादा, 'केपीं'च्या राजकीय भूमिकेकडं लक्ष्य

त्यानुसार किमान ५० ते १०० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना प्रत्येकी १५ लाख, १०० ते २०० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना २० लाख तर २०० हून अधिक गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

दरम्यान, दुग्धोत्पादन, शेती काम, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या अथवा असलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे, या पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे, गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे, गोमूत्र, शेण आदींपासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उपपदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा नव्याने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे.

Govardhan Govansh Seva Kendra Yojana
Siddheshwar Factory : चिमणीच्या पाडकामानंतरही विमानाचं उड्डाण अवघड; 62 एकराचा वाद, 105 अडथळे

असा करा अर्ज

‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ ही अनुदान योजना सुरू केली होती; परंतु गेली काही वर्षे ती बंद होती. यंदा पुन्हा ती पुनर्जीवित केली आहे. या योजनेतून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना येत्या १९ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. या योजनेचा अर्ज व इतर माहिती पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे मिळू शकेल. अनुदान मागणीचे अर्जही पंचायत समित्यांकडेच सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

असे आहेत लाभार्थीचे निकष

  • संस्थेस गोवंश संगोपनाचा तीन वर्षांचा अनुभव

  • धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी आवश्‍यक

  • तीन वर्षांचे लेखापरीक्षण आवश्‍यक

  • पशुधनाच्या देखभाल, चाऱ्यासाठी स्वत:च्या उत्पन्नाचे साधन हवे

Govardhan Govansh Seva Kendra Yojana
NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

गाई पाळण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गोशाळांना अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेला ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ असे नाव असून, याअंतर्गत जिल्ह्यातील गोशाळेला किमान १५ लाख, २० लाख आणि कमाल २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल.

-डॉ. विनोद पवार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com