लक्ष्मीच्या पावलांनी आली ‘लेक लाडकी’

मुलींचा जन्मदर वाढविणे आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे यासाठी १ ऑगस्ट २०१७ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना लागू करण्यात आली आहे.
Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojanaesakal

मुलींचा जन्मदर वाढविणे आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे यासाठी १ ऑगस्ट २०१७ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना लागू करण्यात आली आहे; परंतु या योजनेला मिळालेला अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना लागू करण्यात आली आहे.

‘मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल. लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षं पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील,’ अशी घोषणा राज्य सरकारच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली. त्यानुसार, ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेचे उद्दिष्ट

  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे

  • मुलींच्या शिक्षणाला चालना देणे

  • मुलींचा मृत्युदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे

  • कुपोषण कमी करणे

  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे

अशी होते अंमलबजावणी

  • पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळणार

  • मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये

  • मुलगी इयत्ता सहावीत गेल्यावर सात हजार रुपये

  • मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये

  • लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये

  • एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मिळणार

योजनेसाठी लागू असणाऱ्या अटी

  • संबंधित कुटुंबात १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना योजना लागू

  • एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्या मुलीला योजना लागू राहील

  • पहिल्या अपत्याच्या योजनेतील निधीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य

  • दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना योजना लागू

  • लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थी मुलीच्या जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आणि पालकाचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत, मतदान ओळखपत्र, संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत शाळेचा दाखला

अर्ज कोठे करावा?

मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करावी. त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करता येतो.

(संकलन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com