नोटिशीच्या उत्तरासाठी मुदतवाढ द्या : राहुल गांधी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई : वाकडी येथील अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ ट्‌विटरवर शेअर केल्याप्रकरणी राज्य बाल हक्क आयोगाने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या तक्रारीचा अर्ज इंग्रजीत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे. 

जामनेर तालुक्‍यातील वाकडी गावातील विहिरीत पोहणाऱ्या अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ राहुल यांनी ट्‌विटरवर शेअर केला होता. याबाबत महाराष्ट्र बाल हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने 19 जूनला नोटीस पाठवून 29 जूनपर्यंत खुलासा करण्याचे आदेश राहुल यांना दिले होते. 

या नोटिशीनंतर राहुल यांनी आयोगाला पत्र पाठवून संबंधित तक्रार अर्ज मराठीत आहे, तो इंग्रजीत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. ही नोटीस 22 जूनला मिळाली असून, उत्तर देण्यासाठी आणखी 10 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे; मात्र राहुल यांच्या मागण्यांबाबत अद्याप काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली. 

Web Title: Give the extension for the notices reply: Rahul Gandhi