माझ्या हाती सत्ता द्या, बदल घडवेन : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

घोटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने उतरेल. एकादा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, बदल निश्चित घडवून दाखवेन, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला. 

घोटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने उतरेल. एकादा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, बदल निश्चित घडवून दाखवेन, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला. 

इगतपुरी बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर मंगळवार (ता. १८ ) दुपारी एका वाजेदरम्यान मनसेच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की इगतपुरी तालुक्याचे भविष्य पाहता राजकीयदृष्ट्या येथील लोकप्रतिनिधी राज्य स्तरावर गांभीर्याने भूमिका मांडत नसल्याने पुढील पिढीचे चित्र अत्यंत वेदनादायी राहील. इगतपुरी तालुक्यात शिल्लकच काही ठेवायचे नाही, असा जणू सरकारने चंग बांधलेला दिसतो. निसर्गाने भरभरून दिलेल सौंदर्य बेसुमार वृक्षतोड, पर्यटनाकडे दुर्लक्ष, बेरोजगारीचा कळस आणि तांदळाचे पठार असतानाही सत्तर वर्षात भाताला हमी भाव नाही. अतिरिक्त भूसंपादनाने तालुका खालसा होत आहे.

ते पुढे म्हणाले, मी जे काही महाराष्ट्र हिताचे सांगत आलो आहे. त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. नाशिकला मनसेच्या सत्ता काळात सुरु ठेवेलेले व मंजूर कामांवर आत्ताचे सत्ताधारी श्रेय घेत आहेत. देशात व राज्यात काँग्रेसच्या आघाडी सरकारला लोक कंटाळले होते. एक भला माणूस म्हणून मोदींना पंतप्रधान करावे हे मी प्रथम मांडले होते. देशात काही बदल होईल, असे वाटले असताना ’सब घोडे बारा टक्के’ असेच हाल दुर्दैवाने पाहायला मिळाले. कल्याणमधील स्मशानभूमी बंद, मंगल कार्यालयातील विवाह तडकाफडकी रद्द तर डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे मारले आणखी काय सांगायला पाहिजे. पंतप्रधान जनतेला वेठीस धरत आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसे संपूर्ण ताकतीने उतरेल, एकादा माझ्या हातात सत्ता देऊन पहा बदल निश्चित घडवून दाखवेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी,व्यापारी,वकील संघ,डॉक्टर असोसियन,धरणग्रस्त,पुनर्वसन आदींनी राज ठाकरे यांना निवेदने दिली. इगतपुरी तालुक्याचे प्रश्न राज्यव्यापी स्तरावर मांडून न्याय मिळवून देण्यासाठी मी व माझे पदाधिकारी काम करील, असा विश्वास देत मी पुन्हा भेटीला येईन असे सांगितले.

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर,अविनाश अभ्यंकर,प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुतडक, जिल्हाध्यक्ष अॅड.रतनकुमार इचम, अनंता सूर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, संघटक भगीरथ मराडे, तालुकाध्यक्ष मुलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, सरपंच हरिष चव्हाण, प्रताप जाखेरे, गणेश उगले, पिंटू चव्हाण यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Give me the power change will happen says MNS Chief Raj Thackeray