रुग्णवाहिकेला रस्ता द्या, नाहीतर १० हजाराचा दंड; एकच नियम पुन्हा मोडल्यास दुप्पट ते दहापट द्यावा लागेल दंड, वाचा नियम...

दररोज बेशिस्त वाहनांना वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड केला जातो. पण, वेळेत दंड न भरल्यास पुन्हा तोच नियम मोडल्यास आपोआप दुप्पट ते दहापट दंड होतो ही वस्तुस्थिती आहे.
traffic rule penalty
traffic rule penaltyesakal

सोलापूर : रस्ते अपघात कमी व्हावेत म्हणून बेशिस्त वाहनचालकांचा दंड वाढविण्यात आला. मात्र, अद्याप अपघात व अपघाती मृत्यू कमी झालेले नाहीत. दररोज बेशिस्त वाहनांना वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड केला जातो. पण, वेळेत दंड न भरल्यास पुन्हा तोच नियम मोडल्यास आपोआप दुप्पट ते दहापट दंड होतो ही वस्तुस्थिती आहे.

रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. रुग्णवाहिका जात असताना वाट न देणाऱ्या वाहनचालकाला १० हजारांचा दंड होवू शकतो. दरवर्षी राज्यातील सरासरी ९८ लाख बेशिस्त वाहनांवर जवळपास बाराशे कोटींपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते.

तरीपण, अनेकजण नियम पाळत नाहीत हे विशेष. सोलापूर, नाशिक, पुणे, नगर अशा जिल्ह्यांमध्ये महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढली, विकासाला नवी दिशा मिळाली. मात्र, वाहनांचा वेग वाढला आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातही वाढले. दंडाची रक्कम वाढविल्यावर अपघात कमी होतील, असा विश्वास होता, पण तो हेतू साध्य होताना दिसत नाही. आता बहुधा वाहतूक पोलिस रोखीने दंड घेत नाहीत. ऑनलाइन दंड आकारला जातो, पण त्याच वाहनचालकाने तोच वाहतूक नियम पुन्हा मोडल्यास त्याला दुप्पट ते दहापट दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

बेशिस्त वाहनचालकांच्या दंडाचे स्वरूप

  • - वाहन चालविताना मोबाईल टॉकिंग करणाऱ्यांना सुरवातीला एक हजारांचा दंड

  • - त्याच वाहनचालकाने पुन्हा मोबाईल टॉकिंग केल्यास (पूर्वीचा दंड भरलेला नसल्यास) १० हजारांचा होतो दंड

  • - सार्वजनिक रस्त्याला अडथळा करणाऱ्या वाहनाला सुरवातीला ५०० रुपयांचा होतो दंड

  • - पुन्हा तेच वाहन रस्त्यात आडवे असल्यास त्या वाहनाला १५०० रुपयांचा होतो दंड

  • - ट्रिपल सिट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पहिल्यांदा पाचशे आणि नंतर दीड हजार रुपये दंड भरावा लागतो

चालकांनी वाहतूक नियम पाळावेत, अपघात होणार नाहीत

वाहनचालकांनी वाहतूक शिस्त पाळायला हवी. पुन्हा तीच तू चूक करून वाढीव दंड भरण्याची वेळ येण्यापूर्वी वाहतूक नियम पाळावेत. वाहन चालविताना प्रत्येकानी घरी आपले कोणीतरी वाट पाहत आहे, आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवायला हवी.

- तानाजी दराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सोलापूर शहर (वाहतूक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com