पवारांना कमळाचा बुके दिलाय अन् घड्याळ माझ्या हातात : उदयनराजे

Given lotus bouquet to Sharad Pawar and the watch in my hands says Udayan Raje
Given lotus bouquet to Sharad Pawar and the watch in my hands says Udayan Raje

कऱ्हाड : ''साताऱ्याचा खासदार कोण असणार हे मतदार ठरवतील. माझ्यापेक्षा एखादा जास्त चांगला वाटत असेल तर लोकांना समोरासमोर चर्चा करुन उमेदवार ठरु द्या. घड्याळ माझ्या हातात असून, कमळाचा बुके मी आत्ताच शरद पवार साहेबांना दिला आहे'', अशी टिप्पणी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) येथे केली. 
 
खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपबरोबर सलगी ठेवली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत आहे. खासदार भोसले यांनी आज रविवारी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कराड (जि. सातारा) येथील समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन केले. त्यांनी काहीकाळ समाधीस्थळ परिसरातील भजनासाठी उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ''साताऱ्याचा खासदार कोण असणार हे मतदार ठरवतील. मी यापूर्वीही सांगितलं आहे, की मतदारांना माझ्यापेक्षा जास्त कार्यक्षम आणि कोणी चांगला आहे, असे वाटत असेल तर माझी काहीच अडचण नाही. समोरासमोर येऊन चर्चा करावी आणि उमेदवार ठरु द्या. आत्ताच मी शरद पवार साहेबांना कमळाचा बुके दिला असून, घड्याळ माझ्या हातात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com