Uday Samant
sakal
झुरिक - ‘भविष्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आपल्या मराठी उद्योगपतींची गुंतवणूक दिसायला हवी. राज्य आता निर्मिती क्षेत्राचे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. धोरणात्मक पातळीवर राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी तातडीने आवश्यक त्या परवानग्या मिळाव्यात म्हणून आपण ही सगळी प्रक्रियाच ऑनलाइन केली आहे. आता देशातील सर्वच उद्योजकांना भविष्यात आपण महाराष्ट्रातच गुंतवणूक करावी असे वाटू लागेल,’ असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केला.