वेलिंगकरांसोबत एकत्रित वाटचाल करू- उद्धव

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

पणजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (आरएसएस) बाहेर पडलेले सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत गोवा विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्रित वाटचाल करू, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) पत्रकार परिषद घेत अधिकृत घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. लष्कराचा एक स्वाभिमान आहे, पण खंडणीसारखे पैसे वसूल करून लष्कर कल्याण निधीला पैसे देण दुर्दैवी आहे, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगाविला.

उद्धव ठाकरे म्हणाले, की गोव्यात यापूर्वीही आलो आहे. यावेळी मी फक्त राजकीय कारणासाठी आलो आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष निवडणूक लढविणार आहे. गोव्यातून यापुढे शिवसेना मागे हटणार नाही. संजय राऊतसारखे जबाबदार नेते आम्ही याठिकाणी लक्ष देण्यासाठी देत आहोत. गोव्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. चांगली माणसे सोबत घेऊन आम्ही गोव्याची निवडणूक लढू. वेलिंगकर यांच्याशी माझी चर्चा झाली असून, आम्ही एकत्र लढण्याचे ठरविले आहे. आमच्यात चर्चा झाल्यानंतर जागा किती लढवायच्या हे ठऱवू. आम्ही गोव्यात पुन्हा एकदा एक पाऊल टाकले आहे. महाराष्ट्रात जसे काम करत आहोत, तसे काम गोव्यातही करू. गोव्यात युती नसल्याने शिवसेना-भाजप युतीचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राबाहेर शिवसेना-भाजप वेगळेच लढले आहे. दिवाळीनंतर आमची बैठक होणार असून, त्यानंतर युतीबाबत चर्चा होईल. आमचे हिंदुत्व दुसऱ्या धर्माचे द्वेष करणारे नाही.

Web Title: Goa: Shiv Sena forms alliance with Subhash Velingkar’s GSM for Assembly elections