Ladki Bahin Yojana e-KYC

Ladki Bahin Yojana e-KYC

esakal

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारीनंतर लाभ मिळालेला नाही. आता ज्यांची ‘ई-केवायसी’ चुकली त्याची ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती सुरु आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे. आता योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १५ एप्रिलपूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत.
Published on

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारीनंतर लाभ मिळालेला नाही. आता ज्यांची ‘ई-केवायसी’ चुकली त्याची ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती सुरु आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे. आता योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १५ एप्रिलपूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे सुरवातीला ११ लाख २० हजार ५६३ लाभार्थी होते. त्यानंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी झाली. त्यात केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात चारचाकी वाहने असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. शेवटचा टप्पा म्हणून सर्वच महिला लाभार्थींना ‘ई-केवायसी’ करण्याचे बंधन घालण्यात आले.

योजनेच्या निकषांनुसार सोलापूर शहर-जिल्ह्यातील तीन लाख महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत. आता ‘ई-केवायसी’वरुन ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचीही नावे वगळण्यात येणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे दीड लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘ई-केवायसी’ राहिलेल्यांना संधी नाहीच

लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थींना ‘ई-केवायसी’ करण्यासाठी तीन महिने मुदत दिली होती. परंतु, या मुदतीनंतरही सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांनी ई-केवायसी केलीच नाही. त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळेल, अशी आशा होती. शासनाकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, पण ती ज्यांची ‘ई-केवायसी’ चुकली त्यांच्यासाठीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांना आता पुढचा लाभ मिळणार नाही.

पडताळणीचा अहवाल सादर, ३१ मार्चपर्यंत ‘ई-केवायसी’तील चुका दुरुस्त कराव्यात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांना वयाच्या ६५ वर्षांपर्यंत लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत सर्व लाभार्थींची निकषांच्या आधारे पडताळणी झाली. त्याचा अहवाल जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

‘लाडकी बहीण’ची सोलापुरातील स्थिती

  • सुरवातीचे एकूण लाभार्थी

  • ११,२०,५६३

  • निकषांच्या पडताळणीत अपात्र

  • अंदाजे ३ लाख

  • ‘ई-केवायसी’ न केलेले

  • १.१३ लाख

  • ‘ई-केवायसी’ चुकलेले

  • ९८,०२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com