
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सरकारनं महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केली आहे, त्यामुळं महागाई भत्ता आता ५३ टक्के इतका झाला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिन कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात सुधारणा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता, असं हा निर्णय घेण्यामागं विचार असल्याचं राज्य शासनानं म्हटलं आहे.