

Indrajeet Sawant : गेल्या चार-पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अनेक लोकांनी आक्षेपार्ह विधान केली आहेत. त्यामुळं आज पुन्हा एकदा महाराजांबाबत वादग्रस्त विधान करण्याची लोकांची हिंमत होत असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. सावंत यांना फोनवरुन धमकी देत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नुकतेच प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीनं आक्षेपार्ह विधान केल्यानं राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.