'मराठी माणसाच्या भरवशावर राजकारण करायचं अन्...'

मराठी माणसाच्या भरवशावर राजकारण करायचं आणि तो संकटात असताना त्याला वाऱ्यावर सोडायचं
'मराठी माणसाच्या भरवशावर राजकारण करायचं अन्...'
Summary

मराठी माणसाच्या भरवशावर राजकारण करायचं आणि तो संकटात असताना त्याला वाऱ्यावर सोडायचं

मागील काही दिवसांपूर्वी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले. यादरम्यान अहमदनगर येथे एका कर्मचाऱ्याने आत्महत्याही केली. यावरून विरोधकांकडून राज्यसरकावर निशाणा साधला जात आहे. गेल्या काही दिवसांत एकूण 31 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील तिघांचा जीव वाचला आहे. इतके होऊनही ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही. यासाठी या सरकारनं कोणतही सात्वंन केलेलं नाही. मराठी माणसाच्या भरवशावर राजकारण करायचं आणि तो संकटात असताना त्याला वाऱ्यावर सोडायचं, हाच ठाकरे सरकारचा मराठी बाणा असल्याचा घणाघात भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे.

'मराठी माणसाच्या भरवशावर राजकारण करायचं अन्...'
अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने वसवलं गाव, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये उल्लेख

आज ट्वीट करुन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना १० नोव्हेंबरच्या आंदोलनात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांविषयी ठाकरे सरकाराने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी एखाद सांत्वन पत्रही आजवर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं नाही. त्यामुळे या सरकारविरोधात येत्या १० नोव्हेंबरला मंत्रालयाच्या मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबियांसमवेत उघड्यावर संसार मांडण्याचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हे आंदोलन लोकशाही मार्गाने लढू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला कोणताही गालबोट लागू नये याची खबरदारी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियाना घ्यायची आहे. 'आता एकच निर्धार, मंत्रालयाच्या दारात थाटू आपला संसार,' आता आत्महत्येचा पाऊल उचलायचं नाही, जगायचं आणि लढायचं असं आवाहनही त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com