
'पवारांची संस्कृती अन् संस्कार महाराष्ट्र शिकला तर तो आणखीन मातीत जाईल'
'पवारांनी महाराष्ट्राला संस्कृती, संस्कार शिकवण्याची गरज नाही'
दोन दिवसांपू्र्वी पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या (NCP) महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिलांवर हात उगारणाऱ्या भाजपची कानउघडणी केली आहे. गरज पडली तर, कोर्टात जाऊ आणि ऐकायला तयार नसतील अशा लोकांचे हात तोडून हातात देऊ, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. दरम्यान, भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी खासदार सुळेंवर आणि पवार घरण्यावर निशाण साधला आहे. (Gopichand Padalkar on Sharad Pawar)
यांसंदर्भात आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, शरद पवार यांनी महाराष्ट्राला संस्कृती शिकवण्याची गरज नाही. तुमची संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्र (Maharashtra) शिकला तर राज्य आणखीन मातीत जाईल, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, संस्कार नाही असं वक्तव्य खासदार सुळे यांनी केलं आहे. त्यांनी काही वक्तव्य केली की, ती माफ करायाची कारण त्या शरद पवारांच्या कन्या आहेत. मात्र सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील महिलांच्या बाबतीत किती चुकीच्या वागत आहेत याचा प्रत्यय आला आहे.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष एका मुलीचं लैगिंक शोषण करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्याला घेऊन तुम्ही विमानातून फिरता मात्र यावर काही भाष्य करत नाही नाही. पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली यावर तु्म्ही ब्र शब्द काढत नाही. राणा दाम्पत्याला (Rana Couple) १४ दिवस पोलिस कोठडीत टाकून त्यांच्यावर केस केली. तुमची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे. त्यामुळे पवार यांनी या महाराष्ट्राला संस्कार आणि संस्कृती शिवकवण्यीच गरज नाही. तुमची संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्र शिकला तर तो आणखी मातीत जाईल.
जनतेला हे सर्व माहिती आहे. त्यामुळे खासदार सुळे यांनी सर्व महिलांच्या बाबतीत एकच भूमिका घेणे गरजेचे आहे. पुण्यात शिवसेनेच्या उपनेत्यांनी आणलेल्या विषयावर तुम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या मुलीने वारंवार तिच्यावर अन्याय, अत्याचार झाला असल्याचे सांगितले. याउलट तुम्ही भाजपाच्या चित्रा वाघ यांच्यावरच त्या मुलीला आरोप करायला लावले. त्यामुळे संस्कार शिकवण्याची गरज नाही कारण जनता सर्व जाणून आहे, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारणाऱ्या भाजपला सुळे यांनी चांगलंच सुनावलं असून हे राज्य शाहू, फुले आंबेडकरांचं आहे. त्यामध्ये महिलांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आम्हाला गरज पडली तर, कोर्टात जाऊ आणि ऐकायला तयार नसतील अशा लोकांचे हात तोडून हातात देऊ, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.