
संतोष देशमुख खून प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा सध्या फरार आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत आहे. वाल्मिक कराड हे गोरगरीबांचे दैवत आहे तर धनंजय मुंडेंची तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात, तुम्ही माझ्यावरही काही खोटे आरोप केले तर मी चिठ्ठीत तुमचे नाव लिहून आत्महत्या करणार असल्याची धमकी त्याने आव्हाडांना दिली आहे.