कृषी विभागाच्या शेतीमित्र पत्रकार पुरस्कारावर 'ऍग्रोवन'ची छाप 

agrowon
agrowon

नगर : शेती विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे पत्रकारासाठी  दिल्या जाणारया वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कारावर सकाळ-ऍग्रोवन चीच छाप राहिली आहे. दोन वर्षासाठीच्या सहा पत्रकार पुरस्कारांत तीन पुरस्कार 'सकाळ-अॅग्रोवन च्या पत्रकारांना मिळाले आहेत. 

राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे शेती आणि शेती विकासासाठी काम करणारया शेतकरी, संस्था आणि पत्रकारांना कृषीभूषण, कृषीरत्न, जीजामाता कृषी भूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्दानपंडीत, कृषी सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

आज मंत्रालयातून अध्यादेश काढून कृषी विभागाने २०१५ व २०१६ चे कृषिभूषण व अन्य राज्य पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात पत्रकारांसाठी देण्यात येणारया वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कारासाठी राज्यातून प्रत्येक वर्षासाठी तीन पत्रकाराची निवड केली आहे. त्यात सूर्यकांत नेटके (नगर), संदीप नवले (पुणे) व गणेश कोरे (पुणे ) यांचा समावेश आहे.  त्यामुळे कृषी विभागाच्या वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कारांत अॅग्रोवन चीच छाप पडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com