

Relief for farmers affected by heavy rains
ESakal
मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांच्या निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे. यात रब्बी हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचाही समावेश आहे. या मदतीचे चार शासननिर्णय आज प्रसिद्ध करण्यात आले. आजपर्यंत शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ११ हजार ५९३ कोटी ९४ लाख रुपयांचे वितरण केले आहेत.