देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपचे 'अच्छे दिन' का : पी. चिदंबरम

वृत्तसंस्था
Thursday, 5 December 2019

तुरूंगामधून बाहेर येताच आज पत्रकार परिषद घेत देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली.

दिल्ली : जेलमधून बाहेर येताच आज पत्रकार परिषद घेत देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते म्हणाले, ''पुरावे नसतानाही मला तुरूंगात डांबण्यात. कोणतेही आरोपपत्र नसताना देखील मला जेलमध्ये ठेवले. परंतू या छळामुळे गेल्या 106 दिवसांत मी आतून आणखी कणखऱ बनलो आहे. सरकार माझा आवाज दाबू पाहत आहे पण ते शक्य नाही.''

‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर बोलताना ते म्हणाले, ''देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपचे अच्छे दिन आहेत का
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. आमच्या काळात देशाचा विकासदर 8 टक्क्यांवर होेता, ताे आता 4.5 टक्क्यांवर आला आहे. यामुळे सर्वच क्षेत्रातील विकासाला फटका बसला आहे. सध्या देशाची आर्थि्क स्थिती बिकट आहे. सर्वच क्षेत्रात सध्या मंदी आहे.'' 

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

चिदंबरम यांच्य़ावर सुरु असलेल्या खटल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ''न्यायप्रविष्ठ प्रकऱणावर बोलणार नाही. विकासदराची मोठी घसरण सुरु आहे. त्याचप्रमाणे देशहितासाठी मी बोलत राहणार. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारचे आर्थिक धोरण दिशाहीन आहे.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी, जीएसटीबाबत घेतलेल्या चुकीच्य़ा निर्णयांचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका आज बसत असल्याची टीका त्यांनी केली. देशामधील तरूणांचे रोजगार जाण्यासाठी देखील सरकारचे धोरण कारणीभूत असल्य़ाची टीका त्यांनी केली. यावेळी त्य़ांनी मोदी सरकार माझा आवाज दाबू शकत नसल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Cant Suppress My Voice In Parliament : P. Chidambaram