
महाराष्ट्रातील चालकांना सन्माननीय वेतन आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य सरकारचे अधिकृत प्रवासी अॅप लवकरच एसटी महामंडळामार्फत सुरू केले जाणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या अॅग्रीगेटर धोरणांतर्गत राज्य सरकारच्या पॅसेंजर अॅप तयार करण्याच्या अंतिम मसुद्यावर चर्चा करताना ते मंत्रालयातील त्यांच्या कक्षात बोलत होते. या अॅपचे नावही काही खास ठेवण्यात आले आहे.