संगणक वापर टाळल्यास पदोन्नती नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - संगणक वापरण्यासाठी नकार देणाऱ्या किंवा संगणकाच्या अधिकृत प्रशिक्षणाला नकार देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ दिली जाणार नसून, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. संगणक प्रशिक्षण घेण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नाशीपर्यंत पदोन्नती दिली जाणार नाही.

संगणकीय प्रशिक्षणासाठी सातत्याने मुदतवाढ घेणाऱ्या; मात्र प्रशिक्षणापासून दूर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली जावी, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. संगणक प्रशिक्षणासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात असली तरी प्रशिक्षण टाळण्याकडे अनेक कर्मचाऱ्यांचा कल असल्याने अखेरीस विभागाने कठोर धोरण तयार केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी वाढीव मुदतीतही प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा कर्मचाऱ्यांनी संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करेपर्यंत वेतनवाढ, पदोन्नती दिली जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: government employee computer use promotion