शड्डू घुमणार! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाला सरकारची परवानगी

टीम ई सकाळ
Thursday, 7 January 2021

 कोरोनामुळे सर्वच राष्ट्रीय व राज्य कुस्ती स्पर्धा बंद होत्या. आता राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

मुंबई - कोरोनामुळे सर्वच राष्ट्रीय व राज्य कुस्ती स्पर्धा बंद होत्या. आता राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाने ही परवानगी दिली असून यामुळे कुस्तीपट्टूंसह कुस्ती शौकिनांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

कुस्ती स्पर्धांच्या आय़ोजनासाठी कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी राज्य शासन व भारतीय कुस्ती महासंघाकडे मागितली होती. मात्र राज्यशासनाच्या परवानगी अभावी सर्व अडले होते. आता परवानगी मिळाल्यानं कुस्तीगीर परिषद स्पर्धा आयोजनासाठी सज्ज झाली आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्य भरातून शौकिन येण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनामुळे यावर काही निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोजक्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. दरम्यान, पुण्यातील बालेवाडीच्या बंदिस्त क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन करण्याचा परिषदेचा विचार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government give permission to maharashtra kesari kusti competition