राज्यातील ईडीचे सरकार असंवेदनशील - खासदार सुप्रिया सुळे

राज्यात सत्तेवर असलेले ईडीचे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. सरकारबद्दल रोज जे ऐकायला मिळतय ते चिंताजनक आहे.
Supriya Sule
Supriya SuleSakal
Summary

राज्यात सत्तेवर असलेले ईडीचे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. सरकारबद्दल रोज जे ऐकायला मिळतय ते चिंताजनक आहे.

कऱ्हाड - राज्यात सत्तेवर असलेले ईडीचे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. सरकारबद्दल रोज जे ऐकायला मिळतय ते चिंताजनक आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे राज्य आहे. आम्हाला सत्ता गेल्याचे दुःख नाही, मात्र ज्या पध्दतीने महाराष्ट्राचे राजकारण सुरु आहे हे दुर्दैवी आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सरकार टिकेल का नाही माहीत नाही, मात्र सर्व आमदार तयारीला लागले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुळे शुक्रवारी कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, सत्यजितसिंह पाटणकर, देवराज पाटील, शहाजी क्षिरसागर, प्रशांत यादव आदी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, विकास कामांपेक्षा त्यांच्या मेळाव्यांची चर्चा जास्त सुरु आहे. सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेल्या महाविकास आघाडीचे निर्णय स्थगीत केले आणि नव्या सरकारकडून विकास कामेही केली जात नाहीत.

कोवीडचे पैसे आले नाहीत, पिकांची नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलले ईडीचे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. ९५ टक्के ईडीच्या केसेस विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. ५० खोके पण ग्रामीण भागात पोहोचले आहेत. आम्हाला सत्ता गेल्याचे दुःख नाही, मात्र ज्या पध्दतीने महाराष्ट्राचे राजकारण सुरु आहे हे दुर्दैवी आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे महाराष्ट्र राज्य आहे. आत्ता ज्या पध्दतीने राज्यात राजकारण सुरु आहे, त्याची देशभर चर्चा होते. त्यामुळे आम्हाला प्रचंड वेदना, दुःख होते. न्यायालायावर माझा पुर्ण विश्वास आहे. न्यायदेवतेवर विश्वास ठेवला पाहिजे. जरी नाही चिन्ह मिळाले तरी ग्रामपंचायतीला कार्यकर्ते दहा दिवसात चिन्ह घरोघरी पोहचवतात. त्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com