Government Land: भाडेपट्ट्यावरील जमिनींवर ‘शासन’ कब्जेदार! शासकीय जमिनींवर मालकी सांगणाऱ्यांना राज्य सरकारचा दणका

Government Land On Lease: शासकीय जमिनींवर मालकी सांगणाऱ्यांना राज्य सरकारने दणका दिला आहे. भाडेतत्त्वावर दिलेल्या शासकीय जमिनींवर ‘कब्जेदार’म्हणून ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली जाणार आहे.
Ownership of Government Land On Lease

Ownership of Government Land On Lease

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात भाडेतत्त्वावर दिलेल्या शासकीय जमिनींवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे आणि व्यक्तींना राज्य सरकारने दणका दिला आहे. अशा सर्व जमिनींच्या सातबारा उतारा किंवा अधिकार अभिलेखात (प्रॉपर्टी कार्ड) ‘कब्जेदार’म्हणून आता केवळ ‘महाराष्ट्र शासन’ अशीच नोंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com