esakal | मुंबई वगळता गरब्यास सरकारची नियमांसहित परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई वगळता गरब्यास सरकारची नियमांसहित परवानगी

मुंबई वगळता गरब्यास सरकारची नियमांसहित परवानगी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुंबई वगळता राज्यभर गरबा खेळण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, यासाठी आयोजकांचे आणि गरब्यात सहभागी होणाऱ्यांचे लशीचे दोन डोस पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. जर गरब्याचे आयोजन बंद हॉलमध्ये करण्यात आलं असेल तर त्या हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्केच लोक असणे आवश्यक आहे तर मोकळ्या मैदानात आयोजन असेल तर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.

हेही वाचा: घटस्थापनेपासून मंदिरं उघडणार; मुंबईकरांना मात्र 'हा' नियम लागू

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय की, सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्याकडून गरब्याला मान्यता आहे. ती मान्यता असल्याकारणाने तीन पद्धतीने गरबा खेळता येईल. ओपनमध्ये, ऑडीटोरियममध्ये आणि बंद हॉलमध्ये... जर ओपन एअरमध्ये आयोजन असेल तर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल तर ऑडीटोरियमच्या 50 टक्केच लोकसंख्या असणं बंधनकारक असणार आहे. केटरिंग अथवा इतर सेवा देणाऱ्यांचे देखील दोन डोस पूर्ण होणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन राजेश टोपे यांनी केलं आहे.

loading image
go to top