esakal | फ्रूट वायनरी उद्योजकांना दिलासा; एक रुपयाच उत्पादन शुल्क
sakal

बोलून बातमी शोधा

wine

फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्ष व्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रती बल्क लिटर उत्पादनाला नाममात्र एक रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार आहे.

फ्रूट वायनरी उद्योजकांना दिलासा; एक रुपयाच उत्पादन शुल्क

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील फ्रूट वायनरी उद्योजकाला भरावा लागणार प्रती बल्क लिटर उत्पादनाला आता नाममात्र एक रुपयाचं उत्पादन शुल्क भरावे लागणार आहे. तसा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्ष व्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रती बल्क लिटर उत्पादनाला नाममात्र एक रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील फळ उत्पादकांना होणार आहे. या निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व फळांचा उत्पादन कोकण पट्टयात मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे या भागातील फलउत्पादकाला निश्चितच याचा फायदा होईल.

द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मीड वाईन्सवर उत्पादन खर्चाच्या 100 टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत होतं. याचा थेट परिणाम म्हणून इतर सौम्य मद्याच्या तुलनेत (बीअर व वाईन्स) या वाईन्स व मीड्स बऱ्याच महाग मिळतात. त्याचा परिणाम हा थेट विक्रीवर होत होता. बीअरच्या एका 330 मि.ली बाटलीची किंमत साधारण 150 ते 180 आहे. तर 750 मि.ली ची साधारण टेबल वाईन 250 ते 400 रुपये या दराने बाजारात मिळते. या तफावतीचा परिणाम म्हणून हे वायनरी उद्योग दर महिना केवळ 700 ते 800 पेट्या महाराष्ट्रात विकू शकत होते. शिवाय गेल्या 2 वर्षात या उद्योगात केवळ 4 नवीन उद्योजक जोडले गेले आहेत. त्यामुळे या वाईन उद्योगास चालना मिळण्याकरीता तसेच सं‍बंधित शेतकरी व आदिवासींना प्रोत्साहन देण्याकरीता उत्पादन शुल्क विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार इतर फळांपासून तयार होणाऱ्या मद्याच्या उत्पादनाला चालना मिळेल.

loading image
go to top