Vidhan Sabha 2019 : चौफेर विकास करणाऱ्या हरिभाऊंना विजयी करा  - एकनाथराव खडसे

Vidhan Sabha 2019 : चौफेर विकास करणाऱ्या हरिभाऊंना विजयी करा  - एकनाथराव खडसे

सावदा - केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मोठ्या स्वरूपात विकास कामे केली. तर आमदार हरिभाऊ जावळे यांनी मतदारसंघात विकासकामे केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणारच आहे. हे सांगण्यासाठी कोण्याही ज्योतिषाची गरज नाही. तर बाहेरील खंडणी बहाद्दर निवडणूक लढविणाऱ्यांना थारा देऊ नका, संयमी व काम करणाऱ्या हरीभाऊंना विजयी करण्याचे आवाहन माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ते चिनावल (ता. रावेर) येथे भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

यावेळी महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, डॉ. सुनील नेवे, डॉ. मिलिंद वायकोळे, सरपंच भावना बोरोले, प्रमोद नेमाडे, सौ. वानखेडे, वर्षा पाटील, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, सुरेश धनके, गोपाळ नेमाडे, योगेश बोरोले, सुनील पाटील, भरत महाजन, पी. के. महाजन, अहमद तडवी, राकेश फेगडे, अमोल पाटील, नारायण नेमाडे, मोहन लोखंडे, गोपाळ पाटील, राजीव पाटील, संजय वानखेडे आदी उपस्थित होते. 

यावेळी श्री. खडसे म्हणाले, मी कृषिमंत्री असताना शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. तर उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन केळी पीकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी तापमानाचा निकष हा ४८ वरून ४२ खाली आणले. शेतकरी सन्मान योजना आणली. प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले. जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचा सर्वाधिक पैसा हा रावेर तालुक्यात मिळाला. शेतीसाठी कमीत कमी आठ तास वीज दिली. यासाठी मी व हरिभाऊ यांनी प्रयत्न केले. शेळगाव बॅरेजसाठी निधी आणला. तापी मेगा ‘रिचार्ज’साठीही आम्ही प्रयत्न केले असून, काम ही होणार आहे. ही कामे काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरकारला पंधरा वर्षांत का सुचली नाही. भाजपने नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. प्रत्येक घरात वीज दिली. सातपुड्यात ही वीज पोचविली. कोणतीही योजना असली की आधी माझ्या मतदार संघात हवी, यासाठी हरिभाऊ हे नेहमीच पुढे असल्याचे श्री. खडसे म्हणाले. 

खंडणी बहाद्दरांना थारा देऊ नका 
बाहेरील काही खंडणी बहाद्दर आता रावेर मतदारसंघात निवडणूक लढवीत आहे. अशा भानगडीखोर उमेदवाराला थारा देऊ नका. हे लोक निवडून आले तर मतदारसंघातील शांतता धोक्यात येईल. ‘व्होट फॉर पर्सन’ नव्हे तर ‘व्होट फॉर पार्टी’, ‘व्होट फॉर प्रिन्सिपल’ अर्थात संयमी व विकास करणाऱ्या भाजप पक्ष व उमेदवार हरिभाऊ यांना निवडून देण्याचे आवाहनही आमदार खडसे यांनी केले. 

...तर सातपुडा बोडखा कसा 
हरिभाऊ जावळे म्हणाले, रावेर तालुक्यात आपण चौफेर विकास कामे केली. आमचे विरोधक माजी आमदार म्हणतात रावेर मतदारसंघाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी मला निवडून द्यावे, माझा प्रश्न आहे की अशी कोणती विकास कामे त्यानी केली होती की, वैभव नष्ट झाले. उलट २५ ते ३० वर्षापूर्वी हिरवागार व थंड हवेचे ठिकाण असलेला सातपुडा बोडखा कसा काय झाला. याचे उत्तर त्यांनी द्यावे. गेल्या पाच वर्षांत आम्ही मतदारसंघात विकास केली असून, आपल्याला विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गोपाळ नेमाडे यांनी प्रास्ताविक तर दिलीप भारंबे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com