मोठी ब्रेकिंग! "या' 37 साखर कारखान्यांना सरकारची विनाअट थकहमी 

SUGAR INDUSTRY
SUGAR INDUSTRY

सोलापूर : अडचणीतील 37 साखर उद्योजकांनी सरकारकडे अल्प मुदत कर्ज मिळण्यासाठी विनाअट थकहमी मागितली आहे. दुसरीकडे राज्यातील सातारा, नगर, नाशिक, बीड, सांगली या जिल्ह्यातील सुमारे दोन लाख 64 हजार मे. टन ऊस आगामी गाळप हंगामात शिल्लक राहण्याची शक्‍यता कृषी विभागासह साखर आयुक्‍तालयाने व्यक्‍त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप व्हावे, आगामी हंगामात बहुतांश कारखाने सुरू व्हावेत, या हेतूने सरकारने या सर्वच कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतल्याचे साखर आयुक्‍तालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

आगामी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकारने राज्यातील गाळपाचे एकूण क्षेत्र, प्रत्येक जिल्ह्यातील मागील हंगामात सुरू झालेल्या कारखान्यांचे गाळप, आता किती कारखाने सुरू होतील याचा आढावा घेतला. राज्यातील उसाचे क्षेत्र आगामी गाळपात वाढल्याने कर्जफेडीची क्षमता असलेल्या कारखान्यांना मदत केली जाणार आहे. तर अडचणीतील कारखान्यांना थोडीशी आर्थिक मदत केल्यास सुस्थितीत येणाऱ्या कारखान्यांनाही थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले; जेणेकरून त्यांना कामगारांच्या टोळीसोबत वेळेत करार करता येतील. कामगारांना ऍडव्हान्स देऊन हंगामासाठी बोलावता येईल, हा त्यामागे हेतू आहे. तर यंदाचा हंगाम समाधानकारक झाल्यास अडचणीतील कारखान्यांना आर्थिक बळ मिळेल आणि अडचणी दूर होऊन कारखाना सुस्थितीत येईल, असा विश्‍वासही व्यक्‍त करण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र, राज्य बॅंकेने यंदा रोखठोक भूमिका घेत "एनडीआर' निगेटिव्ह, नेटवर्थ तोट्यात असलेल्या कारखान्यांना शासनाची विनाअट थकहमी मागितली आहे. त्यामुळे अडचणीतील कारखानदारांनी सरकारचा दरवाजा ठोठावल्याचेही सांगण्यात आले. 

या साखर कारखान्यांची सरकारकडे धाव 
संत दामाजी, सहकार महर्षी मोहिते-पाटील, वसंतराव काळे, भीमा, श्री विठ्ठल (सोलापूर), एम. कोल्हे, कुकडी, वृद्धेश्‍वर पाथर्डी, व्ही. व्ही. पाटील, प्रवरा नगर, केदारेश्‍वर, तनपुरे (नगर), वैद्यनाथ, अंबेजोगाई, जय भवानी, सुंदरराव सोळंके, छत्रपती (बीड), मोहनराव शिंदे, हुतात्मा किसान अहिर (सांगली), कुंभी कासारी (कोल्हापूर), भाऊराव चव्हाण (नांदेड), भाऊराव चव्हाण, तुकाई (हिंगोली), विघ्नहार, घोडगंगा, नीरा-भीमा, छत्रपती भवानी नगर, राजगड (पुणे), किसनवीर खंडाळा, किसानवीर भुईंज (सातारा), श्री विठ्ठल साई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (उस्मानाबाद), रामेश्‍वर (जालना), सिद्धेश्‍वर, श्री रेणुकादेवी शरद पैठण (औरंगाबाद), मधुकर (जळगाव), संत शिरोमणी मारुती महाराज (लातूर), किसानवीर प्रतापगड. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com