Bhagatsingh Koshyari | अलीकडे प्रत्येक बाबतीत...; वादग्रस्त वक्तव्यावर कोश्यारींचं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari
अलीकडे प्रत्येक बाबतीत...; वादग्रस्त वक्तव्यावर कोश्यारींचं स्पष्टीकरण

अलीकडे प्रत्येक बाबतीत...; वादग्रस्त वक्तव्यावर कोश्यारींचं स्पष्टीकरण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या मोठा गदारोळ माजला आहे. मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती निघून गेले तर मुंबईत आर्थिक राजधानी राहणार नाही, अशा आशयाचं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. या वरुन विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याच विधानावर आता कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आलं आहे. या निवेदनात कोश्यारी म्हणतात की,मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

हेही वाचा: "मराठी माणसाला डिवचू नका"; कोश्यारींची होशियारी म्हणत राज ठाकरे संतापले!

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणतात, "राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही".

हेही वाचा: भाजपा पुरस्कृत CM होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला - संजय राऊत

पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असंही राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं आहे.

Web Title: Governor Bhagatsingh Koshyari Mumbai Gujarat Controversial Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top