Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारी यांनी लग्न का केलं नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारी यांनी लग्न का केलं नाही?

Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतिसंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून आता नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यांवर वारंवार टिका केली जात होती. एवढचं काय तर त्यांची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांची होती. अखेर राष्ट्रपती यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारलाय.

नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असणारे भगतसिंग कोश्यारी यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी तुम्हाला माहिती आहे का? आणि कोश्यारी यांनी लग्न का केले नाही? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (governor of Maharashtra why is Bhagat Singh Koshyari still single and not married)

भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 ला उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील नामती चेताबागड गावात झाला. त्यांनी त्यांचं संपुर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि बीजेपीला समर्पित केलं. ते आरएसएस विचारधाराचे होते त्यामुळे त्यांनी कधी लग्न केलं नाही. सुरवातीचं शिक्षण त्यांनी अल्मोडामध्ये पुर्ण केलं त्यानंतर त्यांनी आग्रा यूनिवर्सिटीमधून इंग्रजी भाषेत पदवी घेतली . कोश्यारी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव असणारे आणि उत्तराखंड भाजपचे पहिले अध्यक्ष आहे.

भगत सिंह कोश्यारी हे विद्यार्थी जीवनापासूनच पॉलिटिक्समध्ये उतरले. 1961 मध्ये कोश्यारी यांची अल्मोडा कॉलेज मध्ये विद्यार्थी संघाचे महासचिव म्हणून निवड झाली. इंदिरा गांधीद्वारा देशात 1975 मध्ये लावलेल्या आणीबाणीला कोश्यारी यांनी कडाडून विरोध केला होता ज्यामुळे त्यांना पावणे दोन वर्ष जेल मध्ये राहावं लागलं.

कोश्यारी यांनी 1979 ते 1985 आणि नंतर 1988 से 1991 पर्यंत कुमाऊं विश्वविद्यालयाचे एक्जीक्यूटिव काउंसिल म्हणून प्रतिनिधित्व केले. उत्तराखंड बनायच्या आधी 1997 मध्ये कोश्यारी हे उत्तर प्रदेश विधान परिषदचे सदस्य म्हणून निवडून आले.

उत्तराखंड राज्य अस्तित्वात आल्यानंतर नित्यानंद स्वामी मुख्यमंत्री बनले तर कोश्यारी हे उत्तराखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले. या नंतर उत्तराखंड विधानसभा निवडणूकीच्या जवळपास सहा महिन्यापूर्वी उत्तराखंडची सत्ता कोश्यारी यांच्या हाती सोपवण्यात आली होती त्यामुळे ते 30 ऑक्टोबर 2001 पासून एक मार्च 2002 पर्यंत मुख्यमंत्री राहले.

उत्तराखंडच्या 2002 विधानसभा निवडणूकीत भाजपने सत्ता गमावल्यानंतर कोश्यारी यांनी 2002 पासून 2007 पर्यंत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी सांभाळली तर त्यानंतर 2007 पासून 2009 पर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2007 मध्ये बीजेपीला पुन्हा उत्तराखंडमध्ये सत्ता काबीज करण्यात यश आले.

मात्र त्यावेळी कोश्यारींना मुख्यमंत्री बनविले नाही. 2008 पासून 2014 पर्यंत ते उत्तराखंडच्या राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. 2014 मध्ये बीजेपीने नैनीताल सीट संसदीय सीटवरुन त्यांना मैदानात उतरवले आणि पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. मात्र 2019 मध्ये पार्टी त्यांना तिकीट दिले नाही. आरएसएसशी भगत सिंह कोश्यारी यांची जवळीकता पाहून मोदी सरकारने त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपवली होती.