मी ठणठणीत, त्याच आवेशात परत येणार : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वप्रथम पोचले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धऩ पाटील, आशिष शेलार यांची भेट घेतली. राऊत यांची भेट घेतल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले असून, यामध्ये ते ठणठणीत असल्याचे दिसत आहे.

मुंबई : मी ठणठणीत असून, चिंता करायची गरज नाही. लवकरच मी त्याच आवेशात परत येईन, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

फायटर संजय राऊतांनी रूग्णालयातून लिहिले संपादकीय!

आज (रविवारी) सकाळी लिलावती रूग्णालयाच्या बेडवर अँजिओप्लास्टी झालेले संजय राऊत चक्क सामनासाठी संपादकीय लिहिताना दिसले. काल शरिरावर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही हिंमत न हारता त्यांनी आज संपादकीय लिहिले. लिलावती रूग्णालयात राऊतांची अँजिओप्लास्टी झाली. त्यात दोन ब्लॉकेज आढळून आल्याने डॉक्टरांनी लगेच अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. आता राऊतांची तब्येत बरी असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल.

'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट

संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वप्रथम पोचले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धऩ पाटील, आशिष शेलार यांची भेट घेतली. राऊत यांची भेट घेतल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले असून, यामध्ये ते ठणठणीत असल्याचे दिसत आहे. त्यांनीही मी त्याच आवेशात परत येणार असल्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut says i am fit and fine