

कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ केली, त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलं. काल कोल्हापूरमध्ये आंबी व समर्थकांनी गायकवाडांचा निषेध करत आंदोलन केले. आज आमदार गायकवाड यांच्या बुलढाण्यातील घरावर मोर्चा काढला. यावेळी शेकडो कम्युनिस्ट कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले, पण आंबी यांना बुलढाणा पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.