'माझा बंगला काढला'; सरकारकडून गळचेपी : प्रविण दरेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकार हे विरोधकांची गळचेपी करत असल्याची टीका केली आहे. या सरकारने माझा शासकीय बंगला काढून घेतल्याची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

त्याचप्रमाणे दरेकर यांनी सध्या सरकारी बंगल्यांचे नूतनीकरण सुरु आहे, त्याच्या डागडुजीवरती होणाऱ्या करोडोंच्या खर्चावरती ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, ''अशा प्रकारे जनतेच्या पैशांची उधळपट्टी योग्य नाही. हा जनतेचा पैसा आहे, त्याचा योग्य वापर व जनतेच्या कामांसाठी वापर होणे आवश्यक आहे.''

Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...

महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या बंगल्यांचे सध्या नुतनीकरण सुरु आहे. यामध्ये 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. या सर्वाधिक खर्च बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळ यांच्या बंगल्यांवर होत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सारंग बंगल्याच्या डागडुजीसाठी तब्बल 92 लाख खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या उधळपट्टीवर विरोधी पक्ष तरी काय बोलणार? मात्र यावरती प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे.

बंगले व होणारा खर्च

रॉयल स्टोन : 1 कोटी 81 लाख
रामटेक :- 1 कोटी 48 लाख

सातपुडा :- 1 कोटी 33 लाख
मेघदूत :- 1 कोटी 30 लाख
शिवनेरी :- 1 कोटी 17 लाख

पर्णकुटी :- 1 कोटी 22 लाख
अग्रधुत :- 1 कोटी 22 लाख
ज्ञानेश्वरी :- 1 कोटी 1 लाख
सेवासदन :- 1 कोटी 5 लाख

Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt has spent rs 15 cr on repair renovation of ministers bungalows