Gram panchayat Elections : 14 हजारांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींसाठी आज मतदान, गावपातळीवर रंगणार लोकशाहीचा सोहळा

Gram panchayat Elections : 14 हजारांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींसाठी आज मतदान, गावपातळीवर रंगणार लोकशाहीचा सोहळा

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचयतीसाठी निवडणूक होत असून आज राज्यातील 14 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे आज दिवसभर राज्यभर गावपातळीवर लोकशाहीचा सोहळा रंगणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यनंतर इतक्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवता येत नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाड्या, पँनेल करून गावपातळीवर निवडणूक लढवली जाते. एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. यासाठी साडेतीन लाखापेक्षा जास्त उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत.

  • निवडणूक जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींची सख्या - 14 हजार 234
  • एकूण प्रभाग -  46 हजार 923
  • एकूण जागा  - 1 लाख 24 हजार 810
  • प्राप्त अर्ज - 3 लाख 56 हजार 648 (हे एकूण प्राप्त अर्ज आहेत. यातून काही अर्ज छाननीत बाद झाले असू शकतात. तसेच काही अर्ज मागे घेतले गेले असतील. त्यामुळे ही निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या नाही.)

ग्रमपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावपातळीवर "इलेक्शन मुड" राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाला होता. त्याला आज सांयकाळी विराम मिळणार आहे. असं असलं तरी काही ठिकाणी राज्यात अनेक ग्रामपंचयतीची बीनविरोध करण्याची परंपरा अबाधित आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णपणे बिनविरोध झाल्या असतील किंवा काहींच्या अंशतः बिनविरोध झाल्या असतील. लोकप्रतिनीधींनी, आमदारांनी ग्रामपंचायत बीनविरोध व्हावी यासाठी जाहीर बक्षिसांची खैरात केली होती. तर काही ठिकाणी  सरपंचपदाचा लिलाव केल्यामुळे निवडणूक यंत्रणेला दखल घेऊन त्या ठिकाणचे मतदान रद्द करावे लागले आहे. 

महाविकास आघाडीसह विरोधीपक्ष असलेल्या भाजपने यासाठी जोरदार तयारी केल्याचे सांगितले जाते.

Voting for more than 14,000 gram panchayats in the state will be held today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com