esakal | धनंजय मुंडे प्रकरण : "व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील", रेणू शर्माच्या वकिलांचा खळबळजनक दावा
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडे प्रकरण : "व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील", रेणू शर्माच्या वकिलांचा खळबळजनक दावा

धनंजय मुंडे यांची बाजू समोर आल्यांनतर आता तक्रारदार महिलेने मुंबईतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला.

धनंजय मुंडे प्रकरण : "व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील", रेणू शर्माच्या वकिलांचा खळबळजनक दावा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडालीये. स्वतः शरद पवार यांनी यामध्ये लक्ष घालत संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेतलं. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे पक्ष लवकरच याबाबत निर्णय घेईल असं शरद पवार म्हणालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांच्या अहवालानंतर पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय देईल असं म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांची बाजू समोर आल्यांनतर आता तक्रारदार महिलेने मुंबईतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला. यानंतर तक्रारदार महिलेच्या वकिलाने माध्यमांना माहिती दिली आणि तक्रारदार महिलेची बाजू मांडली. रमेश त्रिपाठी यांनी तक्रारदार महिलेची बाजू माध्यमांसमोर मांडली. आमच्याकडे असे व्हिडीओ आहेत, जे लोकांसमोर उघड झाले की सर्वांची तोंडे बंद होतील असं रमेश त्रिपाठी म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? जयंत पाटील यांची थेट प्रतिक्रिया

तक्रारदार महिलेचे वकील म्हणतात...  

गेल्या चार दिवसांपासून आम्ही ओशिवरा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र ओशिवरा पोलिस स्टेशनमधून काहीही दखल घेतली जात नाही म्हूणन आम्ही निराश आहोत. याबाबत मंत्रीजी आमच्या आशिलाची बदनामी करणारे स्टेटमेंट देतायत. ज्यामध्ये आमचे आशिल मंत्र्यांना ब्लॅकमेल करतायत, त्यांची बदनामी करतायत असे आरोप केले जातायत. मी यामध्ये सर्वात आधी स्पष्ट करू इच्छितो की, माझी आशिल आजही पेइंगगेस्ट म्हणून राहते, ज्याचं दहा, बारा हजार रुपये भाडं आहे. आज त्यांच्याकडे दुचाकी, चार चाकी नाही किंवा त्यांच्याकडे कोणतीही प्रॉपर्टी देखील नाही. त्यांच्याकडे त्यांचं स्वतःच घर देखील नाही. कोणतीही महिला असे आरोप करत असेल तर ती ज्याप्रकारे माझी आशिल राहते आहे, तसं राहणार नाही. आता त्यांच्या खाण्याचे वांदे आहेत. आपले दागिने विकून त्या आपलं आयुष्य घालवतायत. त्या केवळ गरीब आणि अबला असल्याने त्यांच्यावर पावरफुल मंत्री आरोप करतायत. माझ्या अशिलावर ब्लॅकमेलिंगचे खोटे आरोप लावले जातायत. आमच्याकडे इतके पुरावे आहेत जे आता प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने आम्ही माध्यमांसमोर आणू शकत नाही. मात्र आमच्याकडे असे व्हिडीओ आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या समोर आल्यानंतर लोकांची तोंडे बंद होतील.  

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ramesh tripathi advocate of renu sharma says we have many video which are enough to shut mouth of minister

loading image