मुंबई - ज्या क्षणाची मराठी माणूस वाट पाहात होता, तो क्षण अखेर शनिवारी आला. हा क्षण म्हणजे राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवण्यासाठी राज्यभरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांसह मराठी माणसांची शक्ती वरळी डोम येथे एकवटली होती. येथे कोणताही राजकीय झेंडा नव्हता. होता तो फक्त आणि फक्त मराठी भाषेचा जयघोष आणि मराठी माणसाचा जल्लोष.