महावितरण कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास अनुदान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भावामध्ये महावितरणचे अभियंते, कर्मचारी व बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. 

पुणे - राज्यातील वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कोरोनाच्या काळातही काम करणाऱ्या कामगारांची दखल महावितरणकडून घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू आल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना तीस लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महावितरणमध्ये संचालन व दुरुस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयांत कार्यरत असणारे सुरक्षारक्षक यांना देखील 30 लाख रुपयांचे विमासंरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. 

पुणेकरांनो, कोरोना हाताबाहेर जातोय; आजचा आकडा ऐकाल तर धक्का बसेल!

कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भावामध्ये महावितरणचे अभियंते, कर्मचारी व बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

पुण्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच; २३ वर्षीय तरुणानं घेतला गळफास!

महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू राहणार आहे, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grant in case of death of MSEDCL employee by corona

Tags
टॉपिकस