पुण्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच; २३ वर्षीय तरुणानं घेतला गळफास!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

शुभमच्या कुटुंबीयांनाही त्याने आत्महत्या का केली, याबाबत माहिती नाही. त्याची आर्थिक परिस्थिती बरी होती.

पुणे : आत्याच्या घरी आलेल्या भाच्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पद्मावती येथे शनिवारी (ता.२०) दुपारी घडली. संबंधीत तरुण हा काही दिवसांपासून तणावात होता. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून कळू शकले नाही. 

शुभम राजेंद्र बोबडे (वय 23, रा.नवजीवन सोसायटी, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा चप्पल विक्रीचा व्यवसाय होता.

- पुणेकरांनो, कोरोना हाताबाहेर जातोय; आजचा आकडा ऐकाल तर धक्का बसेल!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष हा त्याची आई व लहान भावासोबत राहत होता. शनिवारी दुपारी तो पद्मावती येथे राहणाऱ्या त्याच्या आत्याच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात त्याची आत्या व तिचा मुलगा होता. शुभम आत्याच्या घरी पोचल्यानंतर थेट घराच्या वरच्या खोलीत गेला. तेथे त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

- काय सांगता? एका महिलेमुळं इंदापूरातील सहा गावे बफर झोनमध्ये!

दरम्यान, शुभमचा आतेभाऊ वरच्या खोलीत गेला, त्यावेळी त्याला शुभमने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने शुभमला तत्काळ खाली उतरवून पोलिसांना याची खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेला.

शुभमच्या कुटुंबीयांनाही त्याने आत्महत्या का केली, याबाबत माहिती नाही. त्याची आर्थिक परिस्थिती बरी होती. तो काही प्रमाणात तणावात असला तरीही त्यामुळे तो आत्महत्या करणार नाही, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणने असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 year youth committed suicide by hanging himself at Padmavati Pune