पुणेकरांनो, कोरोना हाताबाहेर जातोय; आजचा आकडा ऐकाल तर धक्का बसेल!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

या पुढच्या काळातही रोज रुग्ण वाढत राहणार आहेत, हेही या खात्याच्या सूत्रांनी पटवून दिले. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी प्रत्येकाला ख्‌बरदारी घ्यावी लागणार आहे. 

पुणे : पुणेकरांनो, कोरोना हाताबाहेर जातोय. रविवारच्या आकड्यांनी तर तो खरोखरीच हाताबाहेर गेल्याचे दिसून आलेय; म्हणजे, एका दिवसात सुमारे सव्वासहाशे जणांना कोरोनाची बाधा झालीय. हा आकडा थांबण्याची चिन्हे आरोग्य यंत्रणेला कुठेच दिसेनाशी झालीत.

अर्थात, आपल्याकडचे "सोशल डिस्टिन्सिंग' संपल्यानेच रुग्णांची संख्या वाढत आणि ती आणखी वाढण्याची भीती आरोग्य यंत्रणेला आहे. त्यामुळे पुणेकरांनो, आपल्याला खूपच काळजी घ्यावी लागेल. विनाकारण रस्त्यांवर उतरण्यापासून, नको तिथे गर्दी, "सोशल डिस्टिन्सिंग'कडे पाठ फिरवणे हे पूर्णपणे आता टाळावे लागणार आहे. 

- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापुढे राहणार हवेलीकरांचे वर्चस्व; वाचा सविस्तर बातमी

रुग्णसंख्या वाढतानाच कोरोनामुक्तांचा आकडा थोडासा खाली असून, दिवसभरात 171 रुग्ण बरे झाले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत 510 जणांचा मृत्यू झाला आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. दिवसभरात नवे सर्वाधिक 620 रुग्ण सापडले असून, याआधी सर्वाधिक 472 रुग्णांची नोंद आहे. 
लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यांत शिथिलता आल्यानंतर बहुतांशी व्यवहार पूर्ववत झाले आणि रस्त्यांवर लोकांची गर्दी वाढली. त्याचवेळी कोरोनाच्या संसर्गाला मोठा वाव मिळाला आणि रोजच्या रुग्णसंख्येत भर पडत गेली आहे.

- काय सांगता? एका महिलेमुळं इंदापूरातील सहा गावे बफर झोनमध्ये!

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून रोज साधारपणे 300 नागरिकांना कोरोना झाल्याचे अहवाल आले आहेत. त्यानंतर मात्र, गेल्या पाच दिवसांत अचानक रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त झाली. तेव्हा, नागरिकांची तपासणी वाढल्याने रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, रोज अडीच ते तीन हजार जणांची तपासणी झाली तरी; त्यातील केवळ नऊशे नागरिकांचा अहवाल येतो. त्यामुळे तपासणीच्या वेगामुळे रुग्ण वाढले हे कारण आरोग्य खात्याकडून मान्य केले जात नाही. मात्र, लोकांकडून योग्य ती काळजीच घेतली जात नसल्याचे हे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांकडून रविवारी स्पष्ट करण्यात आले.

- बनावट प्रवासी पास तयार करून त्याची विक्री करायचा फोटोग्राफर; मग...

या पुढच्या काळातही रोज रुग्ण वाढत राहणार आहेत, हेही या खात्याच्या सूत्रांनी पटवून दिले. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी प्रत्येकाला ख्‌बरदारी घ्यावी लागणार आहे. 
पुण्यात आतापर्यत 88 हजार नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यातील 12 हजार 474 लोकांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यातील 7 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. तर 510 जण मरण पावले आहेत. सध्या साडेचार हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

- परिस्थितीशी दोन हात करत पुण्यातील मोनिका बनली उपशिक्षण अधिकारी

रविवारचे नवे रुग्ण - 620 
बरे झालेले रुग्ण - 171 
मृत्यू झालेले रुग्ण - 6

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 620 new corona patients found on Sunday 21st June