अवकाळीने झालेल्या नुकसानीचा गोंधळ; फडणवीस व कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत

ही तफावत आढळून आल्यामुळे आता नुकसानीचा आकडा नक्की किती आहे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
Heavy Rain
Heavy Rain esakal

राज्यात होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. काही भागांमध्ये गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालं. मात्र नक्की किती नुकसान झालं याबद्दल अर्थमंत्री आणि कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीत असलेल्या तफावतीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाने राज्यातल्या १३,७२९ हेक्टर पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे. मात्र कृषी विभागाने दिलेल्या याच दिवसाच्या आकडेवारीनुसार काढणीला आलेली ३८,५६३ हेक्टरवरील रब्बी पिकं, फळबागा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे. याबद्दलचं सविस्तर वृत्त 'लोकसत्ता'ने प्रसिद्ध केलं आहे.

Heavy Rain
Budget 2023 : कोणाच्या सरकारमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; अजित पवारांनी सांगितली आकडेवारी

नुकसानीबद्दल कृषी विभागाने दिलेली आकडेवारी

  • जळगाव - ८९६६ हेक्टर

  • धुळे - ८१५६ हेक्टर

  • छत्रपती संभाजीनगर - ७५६८ हेक्टर

  • नगर - ४१७७

  • नाशिक - ४१५५ हेक्टर

  • पालघर- २०१७ हेक्टर

  • नंदूरबार - १७५३ हेक्टर

  • बुलडाणा - ७७५ हेक्टर

  • रायगड- २२५ हेक्टर

  • वाशिम - ४७५

  • अकोला - ११५ हेक्टर

  • सिंधुदुर्ग- ४३ हेक्टर

  • पुणे - ३९ हेक्टर

  • सोलापूर - १३ हेक्टर

देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेली आकडेवारी

  • जळगाव - २१४ हेक्टर

  • धुळे - ३१४४ हेक्टर

  • नाशिक - २६८५ हेक्टर

  • पालघर- ७६० हेक्टर

  • नंदूरबार - १५६७ हेक्टर

  • बुलडाणा - ७७५ हेक्टर

  • वाशिम - ४७५ हेक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com