खाकी संसर्गाच्या विळख्यात! राज्यात 48 तासांत 352 पोलिसांना कोरोनाची लागण...

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यातील पोलिस नागरीकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. गेल्या 48 तासांचा विचार केला, तर राज्यभरात 352 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यातील पोलिस नागरीकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. गेल्या 48 तासांचा विचार केला, तर राज्यभरात 352 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोव्हिड रुग्णालयांमधील लूटमार थांबनार कधी? मनसेची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार  

राज्यातील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा आठ हजार 584 वर पोहोचला आहे. त्यात 892 अधिकारी व 7 हजार 692 कर्मचा-यांचा समावेश आहे. गेल्या 48 तासांत राज्यातील कोरोनाबाधीत पोलिांचा आकडा 352 ने वाढला आहे. राज्य पोलिस दलातील 6 हजार 538 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

'तो' व्हिडिओ डोंबिवलीतील नव्हेच; व्हायरल व्हिडिओचं सत्य अखेर उघड...

महाराष्ट्र पोलिस दलात सद्यस्थितीला 1952कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात 220 अधिकारी आणि 1732 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यात 94 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेळीत या संसर्गाला आवरले नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणूनच मुंबई पोलिस दलात 24 जुलै ते 29 जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिकविभागातील परिमंडळानुसार  ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन  टेस्ट’ची  टेस्ट सुरू करण्यात आली आहे.प्रतिबंधात्‍मक क्षेत्र, कोरोना आरोग्‍य केंद्र तसेच अलगीकरण केंद्र यासह नाकाबंदी व बंदोबस्‍ताच्‍या कर्तव्‍यावर देखील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. अशा पोलिस कर्मचा-यांचीही ‘अँटीजेन कीट’ द्वारे कोविड चाचणी केली जात आहे.  24 जुलैला मुंबई पोलीस दलातील  एक हजार 525 कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. त्यात 31 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे अधिका-याने सांगितले.

-------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the grip of khaki infection! 352 policemen infected with corona in 48 hours