esakal | महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर; दिग्गजांना...
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर; दिग्गजांना...

- अन्य मंत्री भलत्याच जिल्ह्यांचे पालकमंत्री

महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर; दिग्गजांना...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीही जाहीर झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांकडे त्यांच्याच जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. तर बाकीच्या मंत्र्याना मात्र अन्य जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असतानाच त्यांच्याकडे अतिशय महत्वाचे असलेल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे यापूर्वीही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच पदावर त्यांची वर्णी लागली आहे. तर दिलीप वळसे-पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक तर जयंत पाटील यांना सांगलीची जबादारी दिली आहे.   

ZP Election : भाजपला नागपुरात दणका; शिवसेनेची जिल्हा परिषदांमध्ये मुसंडी!

धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री

यातील विशेष बाब म्हणजे युती सरकारमधील मंत्री राहिलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी टाकली आहे.

नितीन राऊत नागपूरचे पालकमंत्री

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांच्याकडे जबाबादरी देण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे 

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे पालकमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे आता गडचिरोलीची जबाबदारीही देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडे वसईची जबाबदारी

वसई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.

काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचा नांदेड, के.सी. पाडवी नंदुरबार, अमित देशमुख लातूर, यशोमती ठाकूर अमरावती असे त्यांचेच जिल्हे दिले आहेत. आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. सुभाष देसाई औरंगाबाद,  अनिल परब रत्नागिरी, दादा भुसे पालघर, गुलाबराव पाटील जळगाव जिल्याचे पालकमंत्री असतील.

ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाकडे जिल्ह्याची जबाबदारी

महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जिल्ह्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे तेथील जबाबदारी दिली आहे. यानुसार कोल्हापूर बाळासाहेब थोरात, अहमदनगर हसन मुश्रीफ, नागपूर नितीन राऊत, ठाणे एकनाथ शिंदे, असे अनेक ठिकाणी पालकमंत्री नेमले आहेत.

पालकमंत्री पुढीलप्रमाणे

1.     पुणे-  अजित अनंतराव पवार
2.    मुंबई शहर - अस्लम रमजान अली शेख
3.    मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे  
4.    ठाणे-  एकनाथ संभाजी शिंदे
5.    रायगड -  आदिती सुनिल तटकरे
6.    रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
7.    सिंधुदुर्ग-  उदय रविंद्र सामंत
8.    पालघर- दादाजी दगडू भुसे
9.    नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
10.    धुळे- अब्दुल नबी सत्तार
11.    नंदुरबार-  के.सी. पाडवी
12.    जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील
13.    अहमदनगर-  हसन मियालाल मुश्रीफ
14.    सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15.    सांगली- जयंत राजाराम पाटील
16.    सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17.    कोल्हापूर-  विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18.    औरंगाबाद-  सुभाष राजाराम देसाई
19.    जालना- राजेश अंकुशराव टोपे
20.    परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21.    हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
22.    बीड- धनंजय पंडितराव मुंडे
23.    नांदेड-  अशोक शंकरराव चव्हाण
24.    उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25.    लातूर-  अमित विलासराव देशमुख
26.    अमरावती- यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27.    अकोला-  ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28.    वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29.    बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
30.    यवतमाळ-  संजय दुलीचंद राठोड
31.    नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32.    वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार
33.    भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34.    गोंदिया-  अनिल वसंतराव देशमुख
35.    चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार
36.    गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे                       

loading image