

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता राज्यात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार पावलं उचलत आहे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा सक्तीची केलीय. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान, आता वाहनांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यावसायिक वाहनांवर लिहिण्यात येणारे संदेश हे मराठीत असावेत असे निर्देश राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.