आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीबाबत मार्गदर्शक सूचना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नागरिकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड’ने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.

मुंबई - राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नागरिकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड’ने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

होमिओपॅथी औषधी 
आर्सेनिकम अल्बम ३० - ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्या. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करा.

गल्ली ते दिल्ली एकच चर्चा, कधी सुटणार कोरोनाच्या लसीचा जांगडगुत्ता?

युनानी औषधी

  • बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब दाने, सपिस्तान ७ दाणे, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळा व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्या. 
  • खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्या. (मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.)

राज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर..

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आयुर्वेदिक औषधी 

  • संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस. 
  • २. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करा. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवा व नंतर हे पाणी प्या. 
  • च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करा (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करा).   
  • ४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेल तेल किंवा हे बोटाने लावा. 
  • तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल/ खोबरेल तेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या करा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidelines for Ayurveda Unani Homeopathy