मुख्यमंत्रीपद सोडलं, वर्षा सोडलं, पण शरद पवारांना सोडायला अजून तयार नाही - गुलाबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulab Patil

मुख्यमंत्रीपद सोडलं, वर्षा सोडलं, पण शरद पवारांना सोडायला अजून तयार नाही - गुलाबराव पाटील

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली. या बैठकी दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं, वर्षा सोडलं, पण शरद पवारांना सोडायला अजून तयार नाही अशा शब्दात शिवसेनेला टोला लगावत(Gulab Patil criticizes Chief Minister Uddhav Thackeray) नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: शिंदे गटाच्या संरक्षणासाठी भाजपा सतर्क; 'आरेला कारे'चीही तयारी

आपण १०० टक्के शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने याठिकाणी पोहोचलो आहोत. आपण या पदापर्यंत पोहोचण्यात आपली किमान २० टक्के मेहनत नक्कीच आहे. आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेसाठी (Shivsena) खूप काही केले आहे, असे वक्तव्य आमदार गुलाबराव पाटील यांनी केले.

तसेच, यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेत केलेल्या संघर्षाविषयी देखील सांगितलं. जेलमध्ये गेल्याची आठवण आणि 1992च्या दंगलीची आठवण देखील त्यांनी करून दिली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या बैठकीमध्ये गुलाबराव पाटील बोलत होते. ‘त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत,’ अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: उद्याचा दिवस काय घेऊन येणार अन् काय घेऊन जाणार?, चित्रा वाघ याचं सूचक ट्वीट

आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे. मात्र, त्याचवेळी काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपला संघर्ष माहिती नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो.

संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत.

हेही वाचा: उद्धव ठाकरे सरकारचा शेवटचा दिवस? आता उरले फक्त तीन पर्याय

संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमान असताना ३५ लग्नं लावून दाखवावती, मग मी त्यांना मानेन. रात्री १२ वाजता रक्ताची गरज पडते किंवा कार्यकर्त्यांना अडचणी येतात तेव्हा आमचा फोन सुरु असतो. त्यामुळे आपण परिस्थिती सांभाळून घेऊ. आपण एवढेच जण त्यांना सभागृहात पुरेसे आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

Web Title: Gulab Patil Criticizes Chief Minister Uddhav Thackeray Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top