Chitra Wagh I उद्याचा दिवस काय घेऊन येणार अन् काय घेऊन जाणार?, चित्रा वाघ याचं सूचक ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh

भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री केली असल्यानं घडामोडींना वेग आलाय

उद्याचा दिवस काय घेऊन येणार अन् काय घेऊन जाणार?, चित्रा वाघ याचं सूचक ट्वीट

सध्या राज्यातील वेगवान हालचाली पाहून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे. दरम्यान, आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा: उद्या बहुमत चाचणी होणार का? सेनेच्या आव्हानावर सुप्रिम कोर्टात तात्काळ सुनावणी

यासंदर्भात वाघ ट्वीटमध्ये म्हणतात की, उद्याचा दिवस काय घेऊन येणार ..? काय घेऊन जाणार..? हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यामुळे आता शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. अपक्ष आमदारांचा गट हा कोश्यारी यांच्याकडे जाऊ शकतो. त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे सांगितले जाऊ शकते. त्यामुळे सरकार बहुमत गमावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावी या मागणीसाठी आम्ही राज्यपालांकडे गेलो असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या भूमिकेवर ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळं उद्याचा दिवस महाराशष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस मानला जात आहे.

हेही वाचा: किशोरी पेडणेकरांना अश्लील भाषेत धमकी; बंद लिफाफ्यातून पत्र

Web Title: Chitra Wagh Says Tomorrow What Will It Bring Maha Vikas Aghadi Govt Future

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..