Maharashtra Politics: मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'या' मंत्र्याचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन दोनदा भेट घेतली होती
Maharashtra Politics: मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'या' मंत्र्याचा गौप्यस्फोट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

मागील 15 दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन दोनदा भेट घेतली होती. याचवेळी नार्वेकर हे शिवसेनेमधून फुटणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवसेना कोणाची याबाबत संघर्ष तर सुरू असताना उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात जाणार असल्याची धक्कादायक माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एका सार्वजनिक कार्यक्रमात केली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics: मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'या' मंत्र्याचा गौप्यस्फोट
Milind Narvekar: कोण आहेत मिलिंद नार्वेकरांची जागा घेणारे रवी म्हात्रे?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेला एकीकडे बळकटी मिळवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असतानाच निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर शिवसेनेला सोडतील की, शिवसेनेला बळकटी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील याकडे सर्व राजकीय पक्षांच लक्ष असणार आहे.

Maharashtra Politics: मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'या' मंत्र्याचा गौप्यस्फोट
CM शिंदेंनी घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट; घरच्या बाप्पाचंही घेतलं दर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com