
मोठी बातमी! सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी सदावर्तेंना दिलासा; जामीन मंजूर
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 जणांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह 115 आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय अकोल्यातील अकोट सत्र न्यायालयानेदेखील सदावर्ते दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप असल्याने सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत (Mumbai Session Court Grant Bail To Gunaratna Sadavarte )
हेही वाचा: ''भारतात आल्यावर 'बच्चन' झाल्यासारखा फिल येतोय''
सदावर्तेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला ही गंभीर घटना होती. यानंतर घटनेत कट रचल्याप्रकरणी सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह 115 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्तेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सदावर्तेंना 50 हजारांच्या जातमुचक्यावर आणि तितक्याच रकमेच्या हमी रकेमवर जामीन मंजूर केला आहे. तर इतर 115 आंदोलकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा: मातोश्रीवर जाण्याची वाट सोपी नाही, एकनाथ शिंदेंचा राणा दाम्पत्याला टोला
काय आहे प्रकरण?
राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी साधारण दुपारच्या सुमारास हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी धडक देत मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. घटनेनंतर साधराणतः तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. दरम्यान, या घटनेत, आंदोलक कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. या सर्व घटनेप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Gunaratna Sadavarte Get Bail In Silver Oak Attack Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..