
मातोश्रीवर जाण्याची वाट सोपी नाही, एकनाथ शिंदेंचा राणा दाम्पत्याला टोला
मुंबई : माध्यमांमध्ये एखादं भडक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळते. त्यामुळेच आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा मातोश्रीवर जाण्याचा हा बालहट्ट आहे. मातोश्रीवर जाण्याची वाट सोपी नाही अशी टीका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्यांवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणावी अन्यथा मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार असे आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.
शिवाय अमरावती मधील शिवसेना कार्यकर्ते रवी राणा यांच्या घरावर सुद्धा धडकले होते. मात्र पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आधीच रोखले त्यानंतर आता मातोश्रीवर येऊन राणा दाम्पत्य हनुमान चालीसा म्हणायचे आव्हान शिवसेनेला देत आहे. त्यामुळे राणा यांनी आधी ते पोहोचणार कसे तिकडे ते सांगावं, मातोश्रीवर पोहोचण्याची वाट लय अवघड असून, सोपी नाही. त्यांनी त्याच्या मतदार संघात रहावं ते ठीक आहे. मात्र भडकाऊ प्रतिक्रिया माध्यमांवर देऊन प्रसिद्धी मिळवण्याचे काम सुरू असल्याचेही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
Web Title: Eknath Shinde On Navaneet Rana Ravi Rana Matoshri Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..