Sharad Pawar: सदावर्तेंचं पुन्हा एकदा डंके की चोट पे! म्हणाले, शरद पवारांना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gunratna Sadavarte and Sharad Pawar

Sharad Pawar: सदावर्तेंचं पुन्हा एकदा डंके की चोट पे! म्हणाले, शरद पवारांना...

मुंबई - आपल्या 'डंके की चोट'साठी परिचीत असलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा तीन दिवसांपूर्वीच ऍक्टीव्ह झाल्याचे दिसून आले होते. सदावर्ते यांनी बौद्ध भिख्खू संघाची तुलना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. आज नव्या सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर सदावर्ते यांनी पुन्हा एकदा पवार फॅमिलीवर हल्लाबोल केला आहे. (Gunrtne Sadavrte news in Marathi)

हेही वाचा: Maharashtra Politics: स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिला; आत्तेबहीणीचा गंभीर आरोप

एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे यांचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर सदावर्ते यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना पवार कुटुंबावर पुन्हा एकदा टीका केली आहे. सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेतल्यामुळे संविधानाचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना हा धडा आहे. तत्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कर्मचारी नोकरीत पुन्हा रुजू झाले आहे. हे अजित पवारांनी शिकून घ्यायला हवं, असंही सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा: Narayan Rane: उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी सुपारी दिली; नारायण राणेंचा गौप्यस्फोट!

दरम्यान शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या ११८ क्रांतीवीराचे निलंबन मागे घेतल्याचा दावा सदावर्ते यांनी केला आहे. यावेळी सदावर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.