Maharashtra Politics: स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिला; आत्तेबहीणीचा गंभीर आरोप

जयदेव ठाकरे अन् स्मिता ठाकरे यांना आत्तेबहीण किर्ती फाटक यांनी फटकारलं
Uddhav Thackeray Cousin Kirti Phatak Allegations Jaidev Thackeray
Uddhav Thackeray Cousin Kirti Phatak Allegations Jaidev Thackerayesakal

एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी मंचावर उपस्थिती लावल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आत्तेबहीण कीर्ती फाटक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिला असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, बाळासाहेब हयात असताना स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये निघालेल्या, शिंदे विसरले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra Political Crisis Balasaheb Thackeray Daughter In Law Smita Thackeray Uddhav Thackeray Cousin Kirti Phatak Allegations Jaidev Thackeray )

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कीर्ती फाटक यांनी संताप व्यक्त केला आहे. कुटुंबातील कलहाचा अशाप्रकारे राजकारणासाठी वापर होणं दुर्देवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या स्मिता ठाकरे?

सध्याचं सुरु असलेलं राजकारण दुर्वैवी आहे. आमच्या कुटुंबियांना हे राजकारण बघाताना त्रास होत आहे. यापूर्वीही अशा प्रकारचं चित्र आपण बघितलं आहे. स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे पहिल्यांदाच असं वागलेले नाहीत. मात्र सध्याची परिस्थितीला गद्दारांचा गट हे उत्तम नाव दिलं आहे. ठाकरे कुटुंबीय आमच्या गटातही आहेत, हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे कुटुंबीयच आम्हाला पाठिंबा देत आहेत, हे त्यांना दाखवायचं आहे, असा आरोप त्यांनी शिंदे गटावर केला आहे.

तसेच, २००९ मध्ये बाळासाहेब हयात असतानाच स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये जायला निघाल्या होत्या. तशा उघड प्रतिक्रिया आणि मुलाखती त्यांनी माध्यमांना दिल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे गोडवेही गायले होते. काँग्रेसची आयडियॉलॉजी कशी छान आहे आणि मला पटते, तीच आपला देश पुढे नेऊ शकते, अशा गप्पा मारल्या होत्या, अशी आठवण कीर्ती फाटक यांनी करुन दिली.

स्मिता ठाकरे यांचे ते विचार आता कुठे गेले, एकनाथ शिंदेंनी त्यांना याबद्दल विचारलं का? बाळासाहेब ठाकरे हयात असताना जी व्यक्ती काँग्रेसचे गोडवे गात होती, त्या व्यक्तीचा स्टेजवर सन्मान करताय, हा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता पाहतेय, असा टोलाही फाटक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com